जीवन हे संघर्षाने व्यापलेलं एक बेट आहे . ज्याला आयुष्यामध्ये या बेटाभोवती असलेल्या संघर्षरूपी पाण्यातुन पोहत यशरूपी काठावर पोहोचता आलं त्याला जग जिंकता आलचं म्हणुन समजा , आणि यशाची पोळी भाजायची असेल तर संघर्षाचे चटके हे सोसावेच लागणार.... कारण सर्वात मोठं यश खुपवेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते .
अशीच एक घटना स्वीडनमध्ये घडली होती .सन 1833 चा तो कालखंड होता . 21 ऑक्टोबर रोजी स्वीडनमधल्या स्टॉकहोम मध्ये बुद्धिमान कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला . आल्फ्रेड नोबेल नाव त्याच ...‛ अस म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ' असाच प्रचंड बुद्धिमान आणि जिज्ञासू वृत्तीचा असणारा हा मुलगा स्विडीश , फ्रेंच , इंग्रजी , जर्मन आणि रशिअन या पाच भाषांचा जाणकार बनला . एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पुर्ण करूनच सोडायची हीच आता त्याची ओळख होती.
दिवस उलटत होते , प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर सन 1850 साली पॅरिसमध्ये एक वर्ष रसायनशास्त्राचा अभ्यास करून नंतर अमेरीकेमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोबेल स्वीडनमध्ये परतले. तरुण वयाला पोहोचलेल्या नोबेल यांनी निरनिराळे प्रयोग सुरू केले. नायट्रोग्लिसरीनचा प्रचंड अभ्यास केला आणि त्याचं मोठया प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी स्विडनमध्ये ज्वालाग्राही विस्फोटकांचा कारखाना सुरू केला. तरुण वय म्हणजे उर्जेनं भरलेला प्रचंड उमेदीचा काळ , काहीतरी करून दाखवायचं असेल तर याच काळात करावं लागत .
पण काळ कोणताही असुद्या माणसाला जर यशाच्या गडावर पोहोचायचं असेल तर संघर्षाच्या पायऱ्या चढाव्याच लागतात . सन 1864 मध्ये आल्फ्रेड यांच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं , एक दिवस कारखान्यात प्रचंड मोठा स्फोट झाला . ज्यामध्ये नोबेल यांचा लहान भाऊ सुद्धा मृत्युमुखी पडला . एकीकडे भाऊ गेल्याचे दु :ख तर दुसरीकडे उराशी बाळगलेले स्वप्न त्या आगीत जळुन राख झाले होते . आसवांनी डोळ्यांमध्ये घर केलं होतं . अशातच पुन्हा एक धक्का बसला, स्फोट झाल्यामुळे कारखान्यावरही बंदी घातली गेली . म्हणतात ना ‘भर दुष्काळात तेरावा महिना' ते हेच , परंतु ही गोष्ट इथेही थांबली नाही त्या स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण युरोपमध्ये आल्फ्रेड यांच्या मृत्युची अफवा पसरली आणि लोकांच्या मुखातुन एकच उदगार बाहेर पडायला लागले. ‘ चांगले झाले मृत्यू विकणारा मारला गेला ' कारखान्यात झालेल्या स्फोटपेक्षाही लोकांचे हे शब्द त्यांच्या काळजावर घाव करत होते .
परंतु जोपर्यंत आपण स्वतः हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कुणीही आपल्याला हरवु शकत नाही . त्यादिवशी आल्फ्रेड यांनी मनाशी निश्चय केला आजपासुन असं काही काम करायचं की जगाने आपले नाव स्वाभीमानानेच घेतले पाहिजे . आणि त्या दिवसापासुन एका नव्या पर्वाची सुरुवात झाली . पण मोठा प्रश्न होता जागेचा , शेवटी त्यांनी जागा शोधुन काढलीच . शहराच्या बाहेर एका जहाजामध्ये आपली प्रयोगशाळा उभारली... पुन्हा प्रचंड जोमाने एका नव्या पर्वाला सुरुवात झाली . आणि पाहता पाहता प्रचंड मोठा स्फोट घडविणाऱ्या डायनामाईक , गेलीनाईट आणि बेलीस्टाईट सारख्या एका पेक्षा एक सरस स्फोटकांचा शोध आल्फ्रेड नोबेल यांनी लावला . हळुहळु हा शोध जगप्रसिद्ध ठरला .
जगभरातील रस्ते , बोगदे , लोहमार्ग यांच्या खोदकामासाठी मोठ्या प्रमाणावर ही स्फोटक वापरली जाऊ लागली . रातो-रात आल्फ्रेड प्रचंड लोकप्रिय झाले . अनेक देशांमध्ये त्यांनी स्वतःचे कारखाने उभारले . जगातल्या मोठ-मोठ्या देशांमधे नोबेल यांच्या मालकीची घरं उभी राहिली . या शोधा मधुन त्यांना प्रचंड संपत्ती प्राप्त झाली. परंतु हे चांगले दिवस जास्त काळ टिकू शकले नाहीत . रात्री समुद्राच्या काठी वाळुचा एखादा किल्ला बनवावा आणि सकाळी बघाव तर तो किल्ला पुर्णपणे उध्वस्त झालेला असावा . असंच काहीतरी आल्फ्रेड नोबेल यांच्या बाबतीत घडलं . जगभरातील अनेक देश परस्परांमध्येच भांडु लागले . सत्ता संघर्ष निर्माण झाला . पाहता पाहता त्या सत्तासंघर्षाच रूपांतर नरसंहारात होवु लागलं , माणसं मारली जाऊ लागली आणि त्याकरिता आल्फ्रेड यांनी शोधलेल्या स्फोटकांचाच वापर होवु लागला आणि आत्तापर्यंत डायनामाईटचा शोधकर्ता म्हणुन ओळखले जाणारे आल्फ्रेड नोबेल लोकांना मृत्यूविक्रेता वाटु लागले . लोक निंदा करू लागले . हा खुप मोठा धक्का होता .
परंतु ध्येय उंच असणारी माणसं हे मार्ग बदलतात ध्येय बदलत नाहीत . आल्फ्रेड यांनी सुद्धा तेच केलं आयुष्यभर प्रचंड मेहनत घेऊन उभी केलेली अगणित संपत्ती एका क्षणात जगाच्या कल्याणाकरिता देऊन टाकली आणि सन 1900 मध्ये संपत्ती या संपत्ती मधुन मानवी कल्याणासाठी काम करणाऱ्या माणसांना पारितोषीक देता यावी यासाठी एका ट्रस्टची स्थापना केली . येथुनच जगातला सर्वोत्तम पुरस्कार म्हणुन ओळखला जाणारा नोबेल पुरस्काराचा जन्म झाला . ज्याचे जनक आहेत द ग्रेटेस्ट सायंटिस्ट आल्फ्रेड नोबेल... सन 1901 पासुन भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , वैदिकशास्त्र , वांड्मय आणि शांतता या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो . सन 1969 मध्ये अर्थशास्त्राचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला आणि एक जगावेगळा शास्त्रज्ञ प्रत्येकाच्या काळजामध्ये अजरामर झाला .
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसं मोठी केली यावरुन मोजता येते आणि आल्फ्रेड नोबेल यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची किती मोठी होती याची प्रचिती जगातल्या प्रत्येक माणसाला नोबेल पुरस्कारांच्या माध्यमातून येतच राहील .
समाप्त -
प्रतिक महल्ले
फोटो श्रेय - साभार गूगल
17 Comments
मस्त,माहीत नसलेलं माहीती पुरवली...👌
उत्तर द्याहटवामनःपूर्वक आभार
हटवाबडिया सर
उत्तर द्याहटवामनःपूर्वक आभार
हटवाजबरदस्त
उत्तर द्याहटवाValuable information
उत्तर द्याहटवाThanks a lot...
Valuable information
उत्तर द्याहटवाThanks a lot
Thank you
हटवामस्त प्रतिक भाऊ उपयुक्त माहिती दिली आपण...
उत्तर द्याहटवामनःपूर्वक आभार
हटवाKhup chhan pratik bhau
उत्तर द्याहटवाThank you
हटवाअप्रतिम लेखन, खुप छान👏👍
उत्तर द्याहटवामनःपूर्वक आभार
हटवाखुप छान प्रतीक भाऊ 🌹
उत्तर द्याहटवाWah...Very nice information...
उत्तर द्याहटवाThank You
हटवाटिप्पणी पोस्ट करा