एक होते मंडेला

18 जुलै 1918 रोजी आफ्रिकेतील ट्रान्स्कीच्या मेवेंजो नामक गावात कृष्णवर्णीय कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. परंतु त्या वेळेला परकीय गोऱ्यांच्या आक्रमणामुळे आफ्रिकेतील परिस्थिती अत्यंत दयनीय होती. स्वतःच्या देशातच नागरिकांना मनसोक्तपणे जगण्याची मुभा नव्हती. बंदुकीच्या जोरावर जनावरांसारख माणसांना वागवलं जात होतं. आफ्रिकेमधील स्थानिक कृष्णवर्णीयांचा जन्म म्हणजे जणू पाप मानल्या जात होतं. वर्णवाद एवढ्या वरच्या थराला गेला होता. की माणूस होण्यासाठी रंग , रूप , पैसा लागत नाही तर माणूस होण्यासाठी माणसामध्ये माणुसकी असावी लागते. हा विचार त्या वेळेला आफ्रिकेपासून कोसो दूर होता. 

अशा कठीण काळात जन्मलेल्या त्या पोराचा संघर्ष परिस्थिती सोबतच माणसांशी सुद्धा होता. अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी त्या पोराला पोरकं करून त्याचे वडील काळाने हिसकावून नेले. पाठीशी तेरा भावडांच कुटुंब.. पाहता-पाहता तो मुलगा तरुण वयाला पोहचला. खिशात पैसे नाहीत म्हणून रोज पायी चालत विद्यापीठात जायचं.. तिथेही कृष्णवर्णीय म्हणून अपमान सहन करायचा. हेच त्या तरुणाचं जीवन बनलेलं होत. परंतु एखादी गोष्ट एखाद्या माणसाला एवढी डिवचते की एक दिवस तो माणूस आपला मूळ स्वभाव विसरून त्या गोष्टीला जीवनातून समूळ नष्ट करण्याचाच प्रण घेतो. इथे त्या तरुणाच्या बाबतीत तेच घडलं. सततच्या अपमानाला कंटाळलेल्या त्या तरुणाने मनाशी निश्चय केला की या वर्णवर्चस्ववादाच्या विरोधात आवाज उठवायचा बस.. त्या तरुणाने भविष्यात फक्त आवाजच उठवला नाही तर कधीकाळी कृष्णवर्णीय म्हणून हिनवला जाणारा तो तरुण सन 1994 साली आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. आपल्या कार्याने सर्व जगाला आश्चर्यचकित करून सोडणाऱ्या त्या महान व्यक्तीच नावं होत नेल्सन मंडेला..

परंतु वर्णवर्चस्ववादाच्या विरोधात उभं राहून एका सामान्य कुटुंबातील मुलगा ते आफ्रिकेचा राष्ट्रपती हा प्रवास कधीच सोपा नव्हता. एखाद्या अन्यायाच्या विरोधात जर आवाज उठवायचा असेल नेतृत्व स्वीकारणं गरजेचं आहे. हे ओळखुन नेल्सन मंडेला यांनी सन 1950 साली एएनसी संघटनेचेचे अध्यक्षपद स्विकारले. दिवसेंदिवस मंडेलांच्या मागे सर्व कृष्णवर्णीय समाज संघटित होवू लागला. मंडेलांनी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक देशांकडे सहकार्याची मागणी केली. यामध्ये भारताचा सुद्धा समावेश होता. परंतु चांगल्या कामासाठी किंमत मोजवीच लागते हा इतिहास आहे. आता मंडेलांचा आवाज म्हणजे परिवर्तनाची आशा बनला होता. म्हणून त्यांना ताब्यात घेवून कारावासाची शिक्षा सुनावली गेली. 

हा कारावास एक नाही , दहा नाही तर जवळपास सत्तावीस वर्ष मंडेलांना भोगावा लागला. जगभरातून अनेक देश त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करू लागले. शेवटी वयाच्या 72 व्या वर्षी ते तुरुंगातुन बाहेर आले. हे त्यांनी सगळं सहन केलं ते स्वतःसाठी नाही तर अनेकांसाठी.. 1993 साली त्यांना नोबेल पारितोषिक 
जाहीर करण्यात आले. काही लोकांच्या नजरेत ते विद्रोही होतेच पण चांगल्या माणसाला विरोध हा असतोच. आतापर्यंत सक्षम नेतृत्व असलेल्या मंडेलांनी 1994 साली दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली आणि ती बहुमताने जिंकली सुद्धा.. 

सामान्य माणूस सुद्धा जिद्दीच्या जोरावर असामान्य कर्तृत्व गाजवू शकतो हे जगाला दाखवून देणारे नेल्सन मंडेला अद्वितीयच.

समाप्त.


- प्रतिक गणेश महल्ले 

Photo Credit - Pexel